
पुणे : टिळक रस्त्यावरील वेगवेगळ्या चौकात वाहतूक नियमनाची जबाबदारी सोपविण्यात आली असताना पुरम चौकात एकत्र थांबून घोळक्याने कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी याबाबतचे आदेश दिले.