बेशिस्त रिक्षाचालकांना वाहतूक शाखेचा दणका

बेशिस्त रिक्षाचालकांना वाहतूक शाखेचा दणका
Published on: 

(सकाळ इम्‍पॅक्‍ट लोगो वापरणे)

रिक्षाचालकांना वाहतूक शाखेचा दणका

तपासणीअंती ६३ गुन्‍हे; ३४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारणी

सातारा, ता. १७ : शहरातील वाहतुकीस शिस्‍त लावण्‍यासाठी शहर वाहतूक शाखेने कारवाईचा धडाका उडवला असून, आज दिवसभरात मध्‍यवर्ती बसस्‍थानक, राजवाडा, समर्थ मंदिर तसेच मंगळवार तळे परिसरात तपासणी करत रिक्षांची तपासणी केली. तपासणीनंतर ६३ गुन्‍हे दाखल करत ३४ हजार ५०० रुपयांचा दंड बेशिस्‍त रिक्षाचालकांकडून वसूल करण्‍यात आला.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव आणि पोलिस उपअधीक्षक विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रामुख्याने रिक्षाचालकांकडून गणवेश नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा चालकांविरुद्ध विशेष कारवाई करण्यात आली. याशिवाय दोन चारचाकी वाहनांच्‍या ब्‍लॅक फील्मिंग हटवत त्‍यांच्‍यावरही कारवाई करण्‍यात आली.
रिक्षाचालकांनी गणवेश परिधान करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, प्रवाशांची सुरक्षितता जपणे तसेच वाहनांची कागदपत्रे व आवश्यक परवानग्या अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध यापुढेही सातत्याने कायदेशीर कारवाई सुरू राहणार आहे. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माने यांनी केले आहे.
...........
66461
सातारा : मंगळवार तळे परिसरात रिक्षा तपासणी करताना राजेश माने व कर्मचारी.
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.