Pune Traffic : सोमवारी पुणे स्टेशन परिसरातील वाहतूकीत बदल
Buddha Purnima : बुद्ध पौर्णिमेनिमित्त १२ मे रोजी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
पुणे : बुद्ध पौर्णिमेनिमित्त सोमवारी (ता.१२) पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.