

Traffic Diversions Announced for Shri Krishna Jayanti and Dahi Handi Celebrations
sakal
पुणे - शहरात श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये होणारी भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने ४ आणि ५ सप्टेंबरला वाहतूकीत बदल केले आहेत. शिवाजी रस्ता, लक्ष्मीबाई रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्त्यावर दहीहंडी फुटेपर्यंत गर्दी असल्याने हे बदल लागु असतील अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.