Pune Traffic : ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतुकीत बदल
Bakri Eid 2025 : ७ जून रोजी बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान परिसरात सामूहिक नमाज पठण असल्याने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
पुणे : शहरात शनिवारी (ता. ७) बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान परिसरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे. या परिसरात वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.