Pune News : अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त शहरात दोन दिवस वाहतूक बदल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त रविवारी (ता. १५) आणि सोमवारी (ता. १६) शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
pune traffic diversion for amit shaha tour

pune traffic diversion for amit shaha tour

sakal

Updated on: 

पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त रविवारी (ता. १५) आणि सोमवारी (ता. १६) शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव विविध मार्गांवर ‘नो पार्किंग झोन’ राहणार असून, अवजड वाहनांना बंदी घातली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनी, जिल्हा परिषद, नेहरू मेमोरियल हॉल, जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेल आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या ठिकाणी दौऱ्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Loading content, please wait...