पुणे - खरेदीसाठी झालेली गर्दी आणि गणेशोत्सवासाठीच्या जाहिरात कमानी उभारण्यासाठी सुरु झालेली घाईगडबडीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दुपारच्या सुमारास झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले.