अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यामुळे शुक्रवारी शहरात वाहतुक कोंडी

बाणेर परिसरात छगन भुजबळ यांच्यासह काही मंत्र्यांच्या गाड्याही अडकल्या वाहतुक कोंडीत
traffic jam in pune due to political leader president ram nath kovind chagan bhujbhal Bhagat Singh Koshyari shard pawar
traffic jam in pune due to political leader president ram nath kovind chagan bhujbhal Bhagat Singh Koshyari shard pawar sakal

पुणे : राष्ट्रपती, राज्यपाल यांच्यासह विविध अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या आगमन व प्रस्थानामुळे शुक्रवारी नागरीकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. त्यातच सायंकाळी बावधन येथील एका लग्नसोहळ्यासाठी अतिमहत्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावली, त्यामुळे बाणेर रस्ता, गणेशखिंड रस्त्यासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीचा फटका नागरी व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांनाही बसला. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होईपर्यंत मंत्र्यांवरही वाहतुक कोंडीत अडकून पडण्याची वेळ आली.

शुक्रवारी शहरामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अतिमहत्वाच्या व्यक्तींचा दौरा होता. राष्ट्रपतींचा बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी बारा वाजताचा कार्यक्रम, कार्यक्रमानंतर पुन्हा राजभवन आणि सायंकाळी पाच वाजता राष्ट्रपती कोविंद विमानतळाकडे रवाना झाले. या काळात वाहतुक पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहतुक थांबविण्यात आली होती. त्यामुळे वाहन चालक अक्षरशः त्रस्त झाले होते. दरम्यान, सायंकाळी माजी मंत्री व आमदार चंद्रशेख बावनकुळे यांच्या मुलाचा लग्नसोहळा बावधन येथील ऑक्‍सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, सायंकाळी राष्ट्रपती कोविंद यांचे दिल्लीकडे प्रस्थान झाले. त्यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल कोश्‍यारी यांचा ताफा विमानतळाकडे गेला होता. त्यानंतर त्यांचा ताफा पुन्हा विमानतळ येथून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राजभवन मार्गे बावधन येथे गेला, तेथून आठ वाजता पुन्हा राजभवन येथे आला. या काळात राज्यपालांच्या ताफा मार्गस्थ होण्यासाठी ठिकठिकाणी वाहतुक थांबविण्यात आली होती. त्यामुळे वाहतुक कोंडी झाली. बाणेर रस्ता परिसरात नागरी व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच अन्य काही मंत्री देखील वाहतुक कोंडून अडकून पडल्याचे चित्र होते. राज्यपालांचा ताफा गेल्यानंतर वाहने सोडण्यात आल्यानंतर नागरीकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. दरम्यान, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यामुळे बाणेर, बावधन, चांदणी चौक, गणेशखिंड रस्ता, महामार्गाजवळ वाहतुक कोंडी झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com