esakal | पीएमपीच्या बसला वाहतूक पोलिसांचे जॅमर 
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमपीच्या बसला वाहतूक पोलिसांचे जॅमर 

पीएमपीच्या कात्रज स्थानकाच्या आवारात उभ्या राहिलेल्या तीन बसला वाहतूक पोलिसांनी रविवारी सकाळी जॅमर लावला

पीएमपीच्या बसला वाहतूक पोलिसांचे जॅमर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे  - पीएमपीच्या कात्रज स्थानकाच्या आवारात उभ्या राहिलेल्या तीन बसला वाहतूक पोलिसांनी रविवारी सकाळी जॅमर लावला. या प्रकरणी पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांच्याकडे दाद मागण्याचा पवित्रा पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी घेतल्यावर जॅमर काढून टाकण्यात आला. परंतु या प्रकारामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कात्रज स्थानकाच्या आवारात खासगी वाहनांचा शिरकाव होऊ नये म्हणून पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार लोखंडी बॅरिकेड्‌स लावले होते. परंतु नव्याने नियुक्त झालेल्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी ते वाहतुकीला अडथळा ठरतात, असे सांगत गेल्या महिन्यात काढून टाकले. त्यामुळे आता स्थानकाच्या आवारातून खासगी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारी सकाळी स्थानकावर उभ्या असलेल्या तीन बसला पोलिसांनी जॅमर लावले. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी थांबविली. वाहतूक पोलिसांनी पूर्वकल्पना न देता कारवाई केल्यामुळे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी जॅमर काढले. तसेच सकाळी साडेअकराच्या सुमारास कात्रज - भोसरी (मार्ग क्र. 299) मार्गावरील बस भोसरीच्या दिशेने जात असताना, वाहतूक पोलिसांनी ती थांबविली. चालकाला खाली उतरविले. त्यानंतर बसला जॅमर लावण्यात आला होता. 

""पीएमपी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. सातत्याने तिला लक्ष्य केल्यास शहराचे नुकसान होईल. याचा पोलिसांनी विचार करावा.'' 
- अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक पीएमपी 

loading image