वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण 

police man.jpg
police man.jpg

पिंपरी : रहदारीस अडथळा ठरणारे वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही घटना तळवडेतील त्रिवेणीनगर चौकात घडली. 

दीपक शंकर यादव (वय 39, रा. त्रिवेणीनगर) व सतीश सोपान खराडे (वय 32, रा. मोशी प्राधिकरण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी पोलिस कर्मचारी विकास आवटे यांना मारहाण केली. याप्रकरणी हवालदार रामहरी तनपुरे यांनी फिर्याद दिली.

सोमवारी दुपारी एकच्या सुमारास त्रिवेणीनगर चौकाजवळील शरदनगर झोपडपट्टीसमोरील रस्त्यावर वाहतूक नियमन सुरू होते. त्या वेळी रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने आरोपींनी मोटार रस्त्यावर उभी केली होती. त्या वेळी तनपुरे यांनी त्यांना मोटार बाजूला घेण्यासाठी सांगितले. मात्र, आरोपींनी नकार देत शिवीगाळ केली.तनपुरे यांच्या मदतीला आवटे आले असता, त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com