वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी पोलिस यंत्रणा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

पुणे : सलग सुटयामुळे शहराभोवतीच्या 'एक्सप्रेस वे' समवेत वेगवेगळ्या महामार्गावर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांकडुन विशेष नियोजन करण्यात आले आहे. गर्दीची ठिकाणे, वाहनाची गर्दी होण्याची वेळ लक्षात घेऊन दिवस व रात्र पाळीमध्ये जादा पोलिस नियुक्त वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहेत.

शनिवार, रविवारची जोडुन आलेली सुट्टी आणि नाताळ अशा सलग सुटया असल्यामुळे मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांमधील नागरिक फिरण्याठी आणि गावी जाऊ लागले आहेत. त्यामुळे पुणे शहराभोवती असलेल्या सातारा रस्ता, नाशिक रस्ता, सोलापूर रोड, नगर रोड या महामार्गासह मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग या मार्गावर वाहतुक कोंडी होण्याची वाहनचालकांमध्ये भीती आहे. 

या पार्श्वभुमीवर राज्य महामार्ग पोलिसांकडुन काही दिवसांपासून अभ्यास करण्यात आला होता. त्यादृष्टीने नियोजन करुन त्याची अंमलबजावणी नाताळ आणि त्यास जोडुन आलेल्या अन्य सुटयांच्यावेळी करण्यात आले. खेडशिवपुर, वेलू यांसारखे वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. रात्रीच्यावेळीही याच पद्धतीने नियोजन करण्यात आले.

''वर्षभरात येणारे विविध सण, गणपती, दिवाळी, उन्हाळा, मे महिना व नाताळची सुट्टी लक्षात घेऊन महामार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन आम्ही नियोजन केले होते. त्याची यावेळी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सूटला. याच पद्धतीने परतीच्या प्रवासातही नियोजन केले जाणार आहे."
- अमोल तांबे, पोलिस अधीक्षक, राज्य महामार्ग पोलिस.

Web Title: traffic police Prepared to control traffic jams