Pune Crime : पावणे दोन हजार बुलेटराजांच्या सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांनी फिरवला बुलडोझर

बुलेट दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई सुरू केली.
Traffic Police Use Bulldozer on Nearly 2000 Bullet Silencers
Traffic Police Use Bulldozer on Nearly 2000 Bullet Silencerssakal
Updated on

पुणे - बुलेट दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई सुरू केली आहे. या 'बुलेट सायलेन्सर विशेष मोहिमे' अंतर्गत वाहतूक पोलिसांनी एक हजार ७६८ बुलेट मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोझर फिरवला.

शहरात बेशिस्त वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार वाढले आहेत. बुलेट दुचाकी वाहनास असलेल्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून अथवा नवीन मॉडीफाय केलेला सायलेन्सर बसवून सार्वजनिक रस्त्यावर, रहिवासी भागात दिवस-रात्र कर्कश आवाज करत भरधाव वेगाने बुलेट चालवून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रकार तरूणांमध्ये वाढत आहेत.

या कर्कश आवाजाने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने अशा बेकायदेशीर सायलेन्सर बसविलेल्या दुचाकी वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. त्यानुसार वाहतूक शाखेतील सर्व विभागांकडून मोहिम राबविण्यात आली.

गॅरेज मालकांवरही कारवाई -

बुलेटच्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अशा सायलेन्सर विक्री करणाऱ्या आणि ते बसविणाऱ्या गॅरेज मालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com