Pune Rains : सातारा कराड कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक सुरळीत 

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

Pune Rains : वारजे माळवाडी (पुणे) : पुण्यावरून सातारा, कराड, कोल्हापूर व सांगलीकडे जाणारा रस्ता महामार्ग तो सुरू आहे. महामार्गावर कोणत्याही पद्धतीचे पावसाचे, अडथळे नाहीत. रात्री महामार्ग बंद होता. असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने सांगण्यात आले. 

संततधार पावसामुळे रात्री बोगद्याजवळ 2 ठिकाणी दरड पडली होती. तसेच साताऱ्याकडे जाणाऱ्या महामार्गावर पाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक बंद केली होती. पुणे- सातारा  ठेकेदार रिलायन्स मधील 20 जणांची टीम आधीच मशीनरीसह येथे उपस्थित होते. तसेच पावसामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. कोंडी कमी होत आहे. बुधवारी दरड पडल्यानंतर ती तातडीने काढण्याचे काम सुरू केले. त्या बाजूची वाहतूक अर्ध्या पाऊण तासात वाहतूक सुरळीत केली.

आज गुरुवारी सध्या तरी कुठे महामार्गावर वाहतूकीला कुठलाही अडथळा नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The traffic on Satara Karad Kolhapur highway is smooth which affected due pune rains