Hadapsar News : मिरवणूक पाहायला गेलेल्या महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

श्रीराम जन्मोत्सवाची डीजेच्या तालावरील मिरवणूक पाहायला गेलेल्या एका महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
Ranjana Jadhav

Ranjana Jadhav

sakal

Updated on: 

हडपसर - श्रीराम जन्मोत्सवाची डीजेच्या तालावरील मिरवणूक पाहायला गेलेल्या एका महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. रंजना रवींद्र जाधव (वय-६५, रा. लेन नंबर १२, ससाणेनगर) असे या महिलेचे नाव असून ससाणेनगर येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पातळी ओलांडून सुरू असलेल्या डीजेच्या अति आवाजामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप संबंधीत महिलेच्या मुलाने केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com