
वेल्हे : कानंद ( ता. राजगड) जवळ गुंजवणी धरणात उडी मारुन पुण्यातील महाविद्यालयीन तरुणाने जीवन संपविले. आत्महत्या करण्या आधी तरुणाने नातेवाईकांना मोबाईलवर मेसेज पाठवला होता. करण शंकर दीक्षित ( वय २४,रा. धनकवडी, पुणे ) असे मयत तरुणाचे नाव असून हा प्रकार आज बुधवारी (ता.१६) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वेल्हे पोलिसांनी हवेली तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या रेक्सु पथकाच्या मदतीने करण याचा मृतदेह धरणातील खोल पाण्यातुन बाहेर काढला.