- सुनील जगतापउरुळी कांचन - हवेली तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर कोरेगाव मुळ गावचे हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण मृत्यूमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे..पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात प्रकाश रमेश इंगळे (वय-२८, रा.खैरेवाडी शिवाजीनगर पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.सदर अपघात १ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कोरेगावमुळ ता.हवेली जि.पुणे गावचे हददीत अल्ट्राटेक फाटा येथे घडला आहे. याप्रकरणी सनी श्रीनिवास कांबळे (वय ३७,रा.एम.एस.ई.बी काॅलनी, अशोकनगर शिवाजीनगर पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..अधिक माहिती अशी की १ एप्रील रोजी रात्री रमेश इंगळे हे आपली दुचाकी एमएच १२ व्हीई ५४४६ यांवरून पुणे कडून सोलापूर बाजूकडे चालले होते.त्यांना अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाने धडक दिली.यामध्ये इ़गळे हे गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.परंतु उपचारापूर्वीच ते मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जाहीर केले..पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भोसले हे करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.