Pune News : थकीत पगारामुळे सिंहगड संस्थेतील सुरक्षा रक्षकाने गळफास घेत संपविले जीवन; संस्थेविरोधात गुन्हा दाखल

तब्बल ४२ महिन्यांचा पगार न मिळाल्याने कर्जबाजारी झालेल्या सुरक्षा रक्षकाने जीवन संपविल्याची घटना घडली.
security guard endlife

security guard endlife

sakal
Updated on

पुणे - तब्बल ४२ महिन्यांचा पगार न मिळाल्याने कर्जबाजारी झालेल्या सुरक्षा रक्षक समीर दाभोळकर (वय ५३) यांनी सिंहगड शैक्षणिक संस्थेच्या आवारात आत्महत्या केल्याची घटना घडली.

याप्रकरणी त्यांचा मुलगा वृषभ दाभोळकर (वय-२२, रा. साइनगर, हिंगणे खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सचिव सुनंदा नवले, उपाध्यक्ष रचना नवले उर्फ अष्टेकर आणि रोहित नवले यांच्यासह विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com