
अकलूज : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अकलूज येथे दुःखद घटना घडली आहे. नीरा नदीत आंघोळ करत असताना आकाश ऊर्फ गोविंद नामदेव फोके (वय २०, रा. झिरपी, ता. अंबड, जि. जालना) हा तरुण पाण्यात बेपत्ता झाला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली.