मंचर - आयुष्याची नवी स्वप्नं डोळ्यांत घेऊन संसाराच्या उंबरठ्यावर उभा असलेला एक तरुण, नियतीच्या क्रूर थट्टेने अचानक हिरावून नेला. काही दिवसांपूर्वीच मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. .सोमवारी (ता. २५) लग्नाचा शुभमुहर्त ठरला. याच दिवशी मंडपात अक्षदा टाकण्यऐवजी दशक्रिया घाटात श्रद्धांजली वाहण्याचा दुर्दैवी प्रसंग मंचर (ता. आंबेगाव) येथील क्षीरसागर कुटुंबावर आला..नाभिक समाजातील सामान्य घरातील अविनाश उर्फ रोहित प्रकाश क्षीरसागर (वय-२७, रा. मंचर) हा तरुण आपल्या आई-वडिलांना घेऊन दुचाकीवरून येत होते. शुक्रवारी (ता. १५ ऑगस्ट) पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथे भीमाशंकर सहकारी कारखान्याजवळ टेम्पोतील लोखंडी पत्रे लागून घडलेल्या भीषण अपघातात अविनाश मृत्यूमुखी पडला. आई-वडील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत..काही दिवसांपूर्वीच त्याचा विवाह ठरला होता. कुटुंबीयांनी लग्नासाठी तयारीला सुरुवातही केली होती. रोहितच्या आयुष्याचा सोहळा रंगवण्याची स्वप्नं डोळ्यांत घेऊन नातेवाईक-परिवार आनंद साजरा करण्यास सज्ज होता. पण नियतीने फार मोठा खेळ केला..सोमवारी जेव्हा लग्नाची गाठ बांधली जाणार होती, त्याच दिवशी त्याच्या दशक्रिया विधीसाठी नातेवाईक व पाहुणे जमले. मंडपात मंगलाष्टकांच्या ऐवजी रडणाऱ्या स्वरांनी वातावरण भारावून गेले. 'आज रोहित आपल्या मध्ये असता, तर विवाह सोहळ्यात आपण सारे जमलो असतो. पण नियतीने सर्वकाही उलथवून टाकले,' अशा भावना उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू बनून ओघळत होत्या..आनंदाच्या पाऊलखुणा कोरल्या जाण्याआधीच मृत्यूच्या सावलीने क्षीरसागर कुटुंब उद्ध्वस्त केले. सुखाच्या उंबरठ्यावर नियतीने खेळलेली ही क्रूर थट्टा, मंचर परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.