सिंहगड रस्ता - सिंहगड रस्त्याला आज झालेल्या पावसामध्ये झाड पडण्याच्या घटना घडल्या यात एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. तसेच पाणी साठवून जागोजागी तळे साचले आणि पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली..सिंहगड रस्ता भागातील गणेश मळा परिसरात विवेकानंद चौकात मोठे पिंपळाचे झाड होते. हे झाड आज (ता. 2 )रोजी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने कोसळले. या झाडाखाली रंजना नवनाथ गिरी (वय 60) या हार फुले विक्री करणाऱ्या महिला बसल्या होत्या. त्यांचे छोटे खानी टपरी वजा दुकान या झाडाखाली होते. मात्र अचानक झाड कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी आहे..यासोबतच पानमळा परिसरात देखील पिंपळाचे झाड पडले. स्वारगेट हून पु. ल. देशपांडे उद्यानाकडे जाणाऱ्या दिशेला हे झाड पडले. तर त्याच्या विरुद्ध बाजूस सहवास हॉल जवळ देखील झाड पडले. यासोबतच माणिक बाग, विश्रांती नगर, आनंद नगर, हिंगण्यातील आतील भाग इत्यादी भागात पाणी साठवण्याच्या घटना घडल्या. वडगाव मध्ये काही ठिकाणी सोसायट्यांच्या सीमा भिंती पडण्याची घटना देखील घडल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.