लोणावळा - जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एल अॅण्ड टी कंपनीसमोर गुरुवारी (ता. १५) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तीन मोटारींच्या भीषण अपघातात १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले आहेत..फिर्यादी अनिस अब्बास पटेल (वय ५३, रा. सिंहगड रोड, पुणे) हे त्यांच्या स्विफ्ट डिझायर (एमएच १४ एलबी १७५९) कारमधून मुंबईहून पुण्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या इर्टिगा कारच्या चालकाने बेदरकारपणे ओव्हरटेक करत स्विफ्ट डिझायरला जोरदार धडक दिली.त्यानंतर मागून येणाऱ्या टाटा नेक्सॉन (एमएच ४६ बीझेड ३३६२) कारलाही धडक बसली. या अपघातात इर्टिगा कारमधील आमिना साजीद मालदार (वय १०) हिला डोके व तोंडाला गंभीर दुखापत होऊन, तिचा मृत्यू झाला..तर फिर्यादी अनिस पटेल यांच्यासह संकेत कोळेकर, आकाश कांगणे (दोघे रा. पनवेल, जि. रायगड), इर्टिगा कारमधील जैनुद्दीन हुसेमिया मालदार, रिहाना जैनुद्दीन मालदार, फारिया साजीद मालदार आणि चालक साजिद जैनुद्दीन मालदार (वय ४२, सर्व रा. खालापूर, जि. रायगड) हे जखमी झाले आहेत. काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. चालक साजिद मालदार याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे..‘गोल्डन अवर’मध्ये वेळीच मदत नाहीलोणावळा शहरापासून हाकेच्या अंतरावर मध्यरात्री तीन कारचा भीषण अपघात झाला. मात्र, जखमींचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ‘गोल्डन अवर’मध्ये १०८ रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही. तब्बल ३५ मिनिटे संपर्क साधूनही रुग्णवाहिका न आल्याने जखमी रक्तबंबाळ अवस्थेत ताटकळत राहिले..अखेर स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे यांच्याशी संपर्क साधला. रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलिसांच्या वाहनांतूनच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.