Narayangaon Accident : पुणे-नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर ट्रकची धडक बसून सात मेंढ्या व कोकरे ठार

नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर ट्रकची धडक बसून मेंढ्यांच्या कळपातील सात मेंढ्या व कोकरे जागीच ठार झाली.
Accident

Accident

sakal

Updated on

नारायणगाव - येथील पुणे-नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर ट्रकची धडक बसून मेंढ्यांच्या कळपातील सात मेंढ्या व कोकरे जागीच ठार झाली. दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. या दुर्दैवी घटनेमुळे वारूळवाडी येथील मेंढपाळ तुकाराम निंबारकर यांना मानसिक धक्का बसला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com