Otur News : बल्लाळवाडी येथे शेततळ्यात बुडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू

बल्लाळवाडी गावच्या हद्दीत शेततळ्यात बुडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी ता. २८ रोजी घडली.
Soham navale and Abhi Pawar

Soham navale and Abhi Pawar

sakal

Updated on

ओतूर - बल्लाळवाडी ता.जुन्नर गावच्या हद्दीत शेततळ्यात बुडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी ता. २८ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. शेततळ्यात बुडून मृत झालेल्या मुलांची नावे सोहम जयसिंग नवले (वय-१२) आणि अभि महेश पवार (वय-१०) दोघे ही राहणार पागरीमाथा, बल्लाळवाडी, ता. जुन्नर येथील आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com