child Crushed to Death by Road Roller
sakal
दौंड - दौंड शहरात एका रोडरोलर खाली सापडल्याने एका बालकाचा चिरडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. डांबरीकरण करताना भरधाव वेगाने रोलर चालविणारा संबंधित चालक फरार झाला आहे.
शहरातील जनता कॅालनी भागात सेंट सेबॅस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. २२ जानेवारी रोजी दुपारी डांबरीकरण सुरू असताना शिवालय अपार्टमेंट समोरील रस्त्यावर रोडरोलर खाली सापडून आर्यन संतोष जाधव ( वय ४, मूळ रा. विजापूर, कर्नाटक, हल्ली रा. अंबालिका कारखाना, बारडगाव सुद्रिक, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याचा चिरडून मृत्यू झाला.