container fire
sakal
पुणे/धायरी - पुणे- बंगळूर महामार्गावर नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. ब्रेक निकामी झालेल्या भरधाव कंटेनरने नियंत्रण सुटल्याने समोरून जाणाऱ्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेनंतर वाहनांना आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.