Pune Accident : हडपसर परिसरात सासवड-पुणे रस्त्यावरील सातववाडी बसथांब्यासमोर सकाळी झालेल्या भीषण अपघातात एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार दिनेश श्रीराम सिरसाठ (वय ३८) यांचा जागीच मृत्यू झाला असून, बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सासवड-पुणे रस्त्यावरील सातववाडी बसथांब्यासमोर मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास घटना घडली. दिनेश श्रीराम सिरसाठ (वय ३८, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे मृताचे नाव आहे.