
वेल्हे : पानशेत धरण आंबेगाव खुर्द (ता.राजगड) येथील पाणलोट धरण क्षेत्रामध्ये पोहताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता.०६) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली असून मोहनीस विजय बोलाटे(वय.३७) सध्या राहणार येरवडा,पुणे.०६ असे असून आपत्ती व्यवस्थापनच्या सदस्यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धरणातून मृतदेह बाहेर काढला या प्रकरणी तरुणाचा भाऊ शुभम विजय बोलाटे याने वेल्हे पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.