Yash Gaikwad
sakal
उरुळी कांचन - कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील 'स्वामी समर्थ स्विमिंग टँक'जलतरण तलावात (स्विमिंग पूल) पोहण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षांच्या निष्पाप बालकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवार (ता. १०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.