

PNE26W46324
गणेश कांबळे
सहा महिन्यांपूर्वी सोलापुरात आलेल्या
तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू
सोलापूर, ता. ३१ : अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षे पुण्यात इंटर्नशीप करून गणेश मनीष कांबळे (वय २४, रा. कुमठानाका, सोलापूर) हा सहा महिन्यांपूर्वीच सोलापुरात आला होता. रविवारी नळाला पाणी आले आणि पाणी भरताना विजेचा शॉक लागून गणेशचा मृत्यू झाला.
मृत गणेशला एक लहान भाऊ असून त्याचे शिक्षण चालू आहे. बहिणीचा तीन महिन्यांनी विवाह नियोजित आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने आता गणेशवरच कुटुंंबाची जबाबदारी होती. त्याची आई मेस चालवून कुटुंबाला मदत करते. सहा महिन्यांपूर्वीच गणेश आईला मदत म्हणून येथेच नोकरीच्या उद्देशाने सोलापूरमध्ये आला होता. नळाला कमी दाबाने पाणी येते, त्यामुळे नळाला मोटार लावली होती. सकाळी दहाच्या सुमारास काही वेळासाठी लाईट गेली आणि पुन्हा लाईट आली. नळाला लावलेला पाइप व्यवस्थित करायला गेल्यावर त्याला विजेचा धक्का लागला आणि तो जोरात किंचाळला. शेजारच्याने विजेचा प्रवाह तातडीने खंडीत केला, पण तोपर्यंत वेळ झाला होता. गणेशला बेशुद्धावस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, पण त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी सदर बझार पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.