- पांडुरंग साठेकोळवण - सोशल मीडियावरील फसवणूक आणि मानसिक छळामुळे एका तरुणीने जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी पौड पोलिसांनी तत्पर तपास करत राजस्थानमधून दोन आरोपींना अटक केली आहे..मृत तरुणी रेणुका लिखिते (वय-२५, रा. चिन्मय विभूती आश्रम, कोळवण, ता. मुळशी) ही एम.ए. (बासरी वादन) शिक्षण घेत होती. ती आश्रमातील महिला वसतिगृहात राहत होती. दि. ६ एप्रिल २०२६ रोजी तिने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. तिचे आई-वडील इंदोर (मध्य प्रदेश) येथे वास्तव्यास आहेत.घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सुरुवातीला आत्महत्येचे कारण स्पष्ट नव्हते; मात्र तांत्रिक तपास आणि मोबाईल विश्लेषणातून या प्रकरणामागे सोशल मीडियावरील फसवणूक असल्याचे उघड झाले..तपासात निष्पन्न झाले की, काही अनोळखी व्यक्तींनी इंस्टाग्रामद्वारे रेणुकाशी संपर्क साधून 'तुझे जुने प्रेम परत मिळवून देतो' असे आमिष दाखवले. त्यासाठी विविध पूजा व विधी करण्याचे सांगत तिच्याकडून वेळोवेळी सुमारे ७४ हजार रुपये ऑनलाइन घेतले. त्यानंतर अधिक पैशांसाठी तिच्या कुटुंबीयांना व तिला इजा करण्याच्या धमक्या देत मानसिक छळ सुरू ठेवला. या सततच्या दबावाला कंटाळून तिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले..या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ११६/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३१८(४), ३०८, ३५२, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कलम ६६-सी व ६६-डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तांत्रिक पुरावे आणि बँक व्यवहारांच्या आधारे आरोपी राजस्थान राज्यातील बीकानेर जिल्ह्यातील नोखा येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार पौड पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी किशन ईश्वरचंद लखारा (वय २२) आणि सुनील रामेश्वरलाल भार्गव (रा. नोखा, बीकानेर) यांना अटक केली..दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांना २ मे २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.दरम्यान, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.