
Tragic Flood Incident: WagonR Drowns in Bhima River, Driver Dies
Sakal
कडूस : टोकेवाडी (ता. खेड) येथील भीमा नदीपात्रात पांढऱ्या रंगाची वॅगनार मोटार पुराच्या पाण्यात चालकासह बुडाली. यामध्ये वाहनचालक ज्ञानेश्वर किसन कोबल (वय ५१, रा. कान्हेवाडी, ता. खेड) यांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता. २८) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.