दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू दोन जखमी
दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू
बारावीचा पेपर देऊन वाढदिवसाच्या खरेदीला जाताना दुर्दैवी घटना; अन्य दोघे जखमी
म्हसवड, ता. ३ : सातारा- पंढरपूर मार्गावरील पिलीवनीक दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हर्षवर्धन शिरतोडे (वय १८, रा. खडकी, ता. माण) आणि स्वप्नील सुळे (वय १८, रा. सुळेवाडी, ता. माळशिरस) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, की बारावीच्या परीक्षेचा पेपर म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या परीक्षा केंद्रावर देऊन स्वप्नील सुळे, साईराज सुळे व गणेश माने हे तिघे (रा. सुळेवाडी) मित्र दुचाकीवरून स्वप्नीलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी साहित्य, कपडे खरेदीसाठी पिलीवकडे जाताना एका माेटारीपुढे निघत असताना त्यांच्या दुचाकीची आणि मावशीला भेटून म्हसवडकडे येणाऱ्या हर्षवर्धन शिरताेडेच्या दुचाकीची समाेरासमाेर धडक झाली. यामध्ये चौघेही गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत अकलूज येथे उपचारासाठी नेत असताना हर्षवर्धनचा मृत्यू झाला, तर स्वप्नील सुळे (वय १८) याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
वाढदिवसादिवशीच स्वप्नीलचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्नील व त्यांचे मित्र गणेश, साईराज हे तिघेही म्हसवडच्या सिद्धनाथ कॉलेजचे विद्यार्थी असून, त्यांची बारावीची परीक्षा सुरू आहे. स्वप्नील सुळेचा वाढदिवशीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांवर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बारावीच्या परीक्षेचा पेपर देऊन स्वप्नीलचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करायचा प्लॅन मित्रांनी केला होता, तर दुसरीकडे कुटुंबात एकुलता एक मुलगा म्हणून स्वप्नीलचा वाढदिवसा करण्यासाठी कुटुंबातील सदस्य तयारीत होते. मात्र, त्याच दिवशी सुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
या अपघातात गणेश माने हा गंभीर जखमी झाला आहे. विशेष बाब म्हणजे बारावीची परीक्षा संपल्यानंतर अकलूज येथे एमएचसीईटीची परीक्षा देण्यासाठी तिघांनीही प्रवेश घेतले हाेते. घटनेची नाेंद पिलीव (ता. माळशिरस) पोलिस ठाण्यात झाली असून, तपास पोलिस हवालदार प्रवीण जाधव करीत आहेत.
.............................................................
छायाचित्र
मृत
हर्षवर्धन शिरतोडे (आयडेंटी छायाचित्र MSW26B02401)
स्वप्नील सुळे ( सडपातळ अंगाचे छायाचित्र MSW26B02402)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

