Video : अन् रस्त्यावर उतरले रेल्वे इंजिन

pune.jpg
pune.jpg

पुणे : साधरण दुपारी साडेचार वाजताची वेळ. पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी रेल्वे क्रॉसिंग येथे नेहमीप्रमाणे वाहतूक सुरु होती. अन् अचानक बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेचे इंजिन आले. महामार्गावर आलेले रेल्वेइंजिन पाहून वाहनचालकांमध्ये चांगलीच तांराबळ उडाली. नक्की काय सुरु आहे हे कोणालाच कळेना. येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी शेवटी रेल्वे इंजिनचा मार्ग मोकळा करून दिला. सुदैवाने कोणतीच दुर्घटना घडली नाही.

पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी रेल्वे क्रॉसिंग अचानक बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेचे इंजिन आले. त्यामुळे वाहनचालाकांच  तांराबळ उडाली.  अचानक रेल्वेचे इंजिन महामार्गावर येऊन थांबल्यानंतर काय सुरु आहे ते कोणाला समजत नव्हते. रस्त्यावर आलेले इंजिनला पाहून वाहनचालक गोंधळले व जिथे रस्ता मिळेल तेथून आपली वाहने काढू लागले.  

बोपोडी येथील रेल्वे क्रॉसिंग वरून कोणतीही रेल्वे मागील अनेक वर्षांपासून जात नाही हा रेल्वे मार्ग पूर्वी खडकीतील अॅम्यूनेशन दारुगोळाकारखान्यातील दारुगोळा नेण्यासाठी वापरत असत, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथून रेल्वेची मालगाडी बंद करण्यात आली आहे. अधिक माहिती घेतली असता, खडकी रेल्वे स्टेशन येथे दुसऱ्या गाडीला मार्ग देण्याकरिता अचानक इंजिनला बोपोडी येथील महामार्गावर आणले होते.  रेल्वे इंजिनभोवती रेल्वे प्रशासनाचा एकही कर्मचारी रस्ता बंद करण्यासाठी नसल्यामुळे हा प्रकार घडला. 

सुदैवाने कोणतीच दुर्घटना घडली नाही. या ठिकाणी पोलिस कर्मचारी व रेल्वे प्रशासनाने कर्मचारी नसल्यामुळे प्रशासनाची निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com