Railway : रेल्वे प्रवास होणार अधिक सुरक्षित

हडपसर ते जीसीएमसीदरम्यान २. ५ किलोमीटर लांबीची एक मार्गिका टाकण्यात येणार आहे. ही तिसरी मार्गिका असणार आहे.
railway
RailwaySakal

पुणे - हडपसर ते जीसीएमसी (घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स) दरम्यान तिसरी मार्गिका व पुणे स्थानकावर सिग्नल यंत्रणेशी निगडित असलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ला रेल्वे बोर्डाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मागील आठवड्यात रेल्वे बोर्ड येथे झालेल्या बैठकीत याला मंजुरी मिळाली आहे. लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल.

हडपसर ते जीसीएमसीदरम्यान २. ५ किलोमीटर लांबीची एक मार्गिका टाकण्यात येणार आहे. ही तिसरी मार्गिका असणार आहे. या मार्गिकेमुळे हडपसर ते जीसीएमसीदरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. हे करीत असताना रेल्वे प्रशासन सिग्नल यंत्रणेच्या बाबतीत जगात प्रगत असलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’चा वापर करणार आहे.

पुणे स्थानकावर पहिल्यांदाच या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. यासाठी सुमारे ९५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे सॉफ्टवेअर बेस तंत्रज्ञान आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रकार थांबतील. तसेच बिघाड झालाच तर त्याचा शोध घेऊन तो तत्काळ दूर करणे सोपे होणार आहे. याचा थेट परिणाम प्रवासी वाहतुकीवर होणार आहे.

‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’चा फायदा काय?

  • संगणकावर केवळ क्लिक करताच रेल्वेला सिग्नल मिळेल. पूर्वी सिग्नल देण्यासाठी केबिन मॅन रिव्हर ओढून सिग्नल देत असे. त्यानंतर पॅनेलवर बटण दाबून सिग्नल देण्यात येत होता.

  • सिग्नलची प्रक्रिया अवघ्या काही सेकंदांत पार पडेल.

  • या यंत्रणेसाठी कमीत कमी जागेचा वापर.

  • देखभाल करणे अगदी सोपे आहे.

  • सिग्नलमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण अत्यंत कमी.

  • बिघाड झाल्यास तत्काळ तो शोधून दूर करता येईल.

हडपसर-घोरपडी तिसऱ्या मार्गिकेचा फायदा काय?

पुणे स्थानकावर शंटिंगसाठी अथवा घोरपडी येथील पिट लाइनवर गाडी घेऊन जाण्यासाठी सोलापूर किंवा मिरज लाइनचा वापर होतो. त्यामुळे या दोन्ही लाइन ब्लॉक होतात. परिणामी, दौंड किंवा मिरजहून पुणे स्थानकावर येणाऱ्या रेल्वे गाड्यांना स्थानकाच्या होम सिग्नलवर शंटिंग पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते.

प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून रेल्वे प्रशासनाने हडपसर ते पुणे स्थानकांदरम्यान तिसरी मार्गिका टाकण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या मार्गिकेमुळे घोरपडीहून पुणे स्थानकावर रेल्वे येताना मिरज व सोलापूरच्या लाइनचा वापर होणार नाही. त्यामुळे त्या मार्गिका ब्लॉक होणार नाहीत. परिणामी, रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत राहील. तसेच भविष्यात हडपसर स्थानकावरून रेल्वेगाड्यांची संख्या वाढविण्यासाठी ही तिसरी मार्गिका फायदेशीर ठरणार आहे.

किमान ५० प्रवासी रेल्वेगाड्यांची १५ मिनिटे वाचतील

पुणे स्थानकावर एका शंटिंगसाठी सुमारे १५ मिनिटांचा वेळ लागतो. शंटिंग सुरू असताना प्रवासी गाड्यांना थांबावे लागते. शंटिंग सुरू असल्याने व फलाट उपलब्ध नसल्याने रोज किमान ५० गाड्यांना होम सिग्नलवर १० ते १५ मिनिटे थांबून राहावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी हडपसर ते घोरपडी दरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम होणार आहे.

हडपसर ते जीसीएमसीदरम्यान तिसऱ्या मार्गिकेला रेल्वे बोर्डाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या संदर्भातला अंतिम आदेशदेखील काही दिवसांत पुणे विभागाला प्राप्त होईल. या सोबतच पुणे स्थानकावर ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’चे काम केले जाणार आहे. यामुळे प्रवासी सेवा अधिक सुरक्षित होणार आहे.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com