
पुणे - पुणे येथे पायलटचे प्रशिक्षण घेणाऱ्या व मूळच्या राजस्थानमधील २१ वर्षीय प्रशिक्षणार्थी पायलट तरुणी रस्ता अपघातात गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ती ब्रेन डेड झाली. मात्र कुटुंबीयांनी केलेल्या अवयावदनाने ६ जणांना अवयव मिळाले.