शिक्षकांचं ट्रेनिंग सुरू; 'नीट'चा निकाल वाढविण्यासाठी 'डीपर'ने घेतला पुढाकार

NEET
NEET

पुणे : वैद्यकीय पदवीला प्रवेश मिळावा यासाठी देशातून सर्वात जास्त विद्यार्थांनी 'नीट' परीक्षेसाठी अर्ज भरले. मात्र केवळ ४०.९४ टक्केच विद्यार्थी यामध्ये उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्राची निकालातील टक्केवारी वाढावी, यासाठी डीपर या संस्थेने पुढाकार घेतला असून, राज्यभरातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे.

महाराष्ट्रात इयत्ता १० वी नंतर सर्वाधिक विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेतात. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेले किमान १४७ गुण मिळवताना विद्यार्थ्यांची दमछाक होते. यामध्ये विद्यार्थ्यांना 'नीट' परीक्षेसाठी व्यवस्थित मार्गदर्शन न मिळणे, उत्तम अभ्यास करण्यासाठी पुरेसे शैक्षणिक साहित्य उपलब्ध नाही होणे आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना योग्य प्रशिक्षण नसल्याने 'नीट'ची तयारी कशी करून घ्यावी हे कळत नाही. यामुळे महाराष्ट्रात 'नीट'मधून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होतो. महाराष्ट्रातील शिक्षकांना योग्य प्रशिक्षण दिल्यास त्यामधून बदल होऊ शकेल, असा विश्वास डीपर संस्थेचे संस्थापक सचिव हरीश बुटले यांनी व्यक्त केला. 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी या चार विषयांचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली असून, हे वर्ग १ नोव्हेंबर पासून सुरू झाले आहेत. शिक्षकांना रोज एका विषयावर किमान १ तास ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात आहे. शिक्षकांना ज्या तांत्रिक अडचणी, विषयाबद्दलच्या समस्या यावर प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी चर्चा केली जाते, तर दर रविवारी विशेष मार्गदर्शन शिबिर घेतले जात आहे. डीपर तर्फे हे प्रशिक्षण शिबिर मोफत घेतले जात असून, राज्यभरातील शिक्षकांनी यासाठी नोंदणी केली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी www.deeper.co.in या संकेतस्थळास भेट द्यावी. 

"१ नोव्हेंबर रोजी या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन झाले आहे. त्यानंतर रोज एका विषयावर प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक शुक्रवारच्या वर्गात व्हिडिओ, एमसीक्यू, नोट्स याबाबत मार्गदर्शन केले जाईल. हे शिक्षक विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन करतील. सध्या साडे सातशे शिक्षकांनी यासाठी नोंदणी केली आहे. सुमारे अडीच हजार शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. सध्या प्रत्येक विषयासाठी १२ जणांची टीम आहे, तसेच प्रशिक्षणासाठी साहित्यही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे."
- हरीश बुटले, संस्थापक सचिव, डीपर

डीपरतर्फे विद्यार्थ्यांना या सुविधा मिळणार 
- डीपरतर्फे १० ते १५ हजारापर्यंत विद्यार्थ्यांना 'नीट'च्या अभ्यासासाठी साहित्य उपलब्ध करून देणार
- प्रश्नसंच, व्हिडिओ, सबजेक्ट बुलेटिन, प्रत्येक धड्यावर ऑनलाइन-ऑफलाइन टेस्ट उपलब्ध करून देणार
- ग्रामीण भागातील, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मदत होईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com