ट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. रस्ते विकास महामंडळाने या सेंटरची जबाबदारी सोमाटण्याच्या पवना रुग्णालयाकडे सोपवली आहे. 

द्रुतगती मार्गावर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. रस्ते विकास महामंडळाने यासाठी दोन वेळा निविदा काढल्या. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा प्रस्ताव अडकून होता. 

सद्यःस्थिती 
द्रुतगती महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर उर्से टोल नाक्‍याच्या पुढे पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वूडस्टॉक हॉटेलच्या पाठीमागील बाजूस हे सेंटर सुरू होणार आहे. या सेंटरकडे जाणारा रस्ता अरुंद व खराब आहे. द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर अपघात झाल्यास या सेंटरवर पोचण्यासाठी रस्त्यावर रुग्णवाहिका वळण्याची सुविधा नाही. सध्या ट्रामा केअर सेंटरसमोरील मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे दुभाजक तोडल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. 

लाइफ सेव्हिंग ट्रीटमेंट 
द्रुतगती महामार्गावर अपघात झाल्यानंतर जखमींना या सेंटरमध्ये आवश्‍यक ते प्राथमिक उपचार देण्यात येणार आहेत. या सेंटरमध्ये दोन ते तीन डॉक्‍टरांची टीम आणि पॅरामेडिकल कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. रुग्णवाहिका आणि अन्य अत्याधुनिक सोयी, सुविधा उपलब्ध असणार आहेत. सेंटरचे काम प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे पवना हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सत्यजित वाढोवकर यांनी सांगितले.

आतापर्यंत या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. बऱ्याचदा अनेकांना उशिराने वैद्यकीय मदत मिळते. भविष्यात हे टाळण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे हे सेंटर तातडीने सुरू होण्याची आवश्‍यकता आहे. 
- नितीन पारखी, स्थानिक नागरिक

Web Title: Trama Center finally accepts