आळंदी मुख्याधिकारी भूमकर यांची बदली; अंकुश जाधव यांच्याकडे पदभार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

आळंदीचे मुख्याधिकारी समिर भूमकर यांच्या जागेवर वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपरिषदमधिल अंकुश जाधव यांची नेमणूक केली.

आळंदी : आळंदीचे मुख्याधिकारी समिर भूमकर यांच्या जागेवर वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपरिषदमधिल अंकुश जाधव यांची नेमणूक केली. तर भूमकर यांची सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे बदली झाली. भूमकर यांची बदली होऊ नये यासाठी आटापीटा करणाऱ्या तालुकास्तरीय राजकीय व्यक्तींसाठी मोठी चपराक असल्याची चर्चा आळंदीत होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

याबाबतचा आदेश नगर विकास विभागातील अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्ध यांनी काढला. कोरोनाच्या विषाणू संसर्गाच्या कामकाजाचे गांभीर्य व निकड पाहता त्यावरील उपाययोजनेचा भाग म्हणून आदेश काढल्याचे अवर सचिव सहस्त्रबुद्धे यांनी म्हटले. दरम्यान, भूमकर यांना आळंदीत मुख्याधिकारीपदाचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. आणखी वर्षभराचा वाढीव कालावधी मिळावा, यासाठी मंत्रालय स्तरावर भूमकर आणि काही राजकीय मंडळी प्रयत्न करत होते. त्यामुळे भूमकर यांच्याबदलीने आळंदीत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुख्याधिकारी भूमकर आळंदी पालिकेत रूजू झाल्यापासून नेहमीच चर्चेत राहिले. आजपर्यंत मुख्याधिका-यांचे दालन सर्वसामान्यांसाठी खुले असायचे. मात्र, मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून भूमकर यांनी दरवाजा बंद करून कारभार केला. सर्वसामान्यांचा त्यांचा संवाद कायमचाच तुटला. नगरसेवकांनाही भेटीसाठी ताटकळत बसावे लागले. नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर आणि भूमकर यांचे अतिक्रमण अनधिकृत बांधकाम आणि वारेमाप नळजोडच्या मुद्यांवर पटले नाही. पालिकेत विविध वार्षिक ठेक्यांच्या निविदा पूर्वीपेक्षा तिप्पट दराने अदा केल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ठेकेदारांबरोबरची सलगी आणि दोन चार नगरसेवकांशीच संवाद ठेवल्याचा आरोप बाकी नगरसेवक करत आहेत. महिला नगरसेवकांना तर जुमानत नव्हते. माहिती अधिकारात माहिती देत नव्हते. दिलीच तर त्रोटत आणि दिशाभूल करणारी माहिती देत. सर्वात महत्वाचे म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून होत असलेल्या विकासकामांत मात्र त्यांनी विशेष नियंत्रण न ठेवल्याने अनेक ठिकाणी पैसे खर्च होवूनही फारसा फायदा झाला नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोट्यवधी रूपये खर्चून पाणी पुरवठा आळंदीत सुरळीत नाही. स्वच्छ तर नाहीच अशुद्ध पाणीही कधीही वेळेत नाही. घनकचरा व्यवस्थापन कोट्यावधी रूपये वर्षाला खर्च करूनही आरोग्य व्यवस्था बिघडली. दर्शनबारीचे आरक्षण उठविण्यासाठी कारण नसताना पूरक अहवाल भूमकर यांनी दिल्याने वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांमधे त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भूमकर यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे गल्लीबोळातील रस्ते सिमेंटचे केले. जवळपास नव्वद टक्के आळंदीतील रस्ते पूर्ण केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfer of Alandi Chief Officer Samir Bhoomkar