पुणे शहर पोलिस दलातील सहा पोलिस उपायुक्तांच्या बदल्या, नवीन सहा जणांची नियुक्ती

गृह विभागाने राज्यातील पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्याचे सोमवारी रात्री आदेश काढले.
Maharashtra Police
Maharashtra Policeesakal
Summary

गृह विभागाने राज्यातील पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्याचे सोमवारी रात्री आदेश काढले.

पुणे - राज्य सरकारच्या गृह विभागाने सोमवारी रात्री पोलिस उपायुक्तांच्या बदल्याबाबत काढलेल्या आदेशानुसार शहर पोलिस दलातील सहा पोलिस उपायुक्तांच्या राज्याच्या विविध भागात बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी अन्य ठिकाणाहून 6 पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गृह विभागाने राज्यातील पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्याचे सोमवारी रात्री आदेश काढले. त्यामध्ये 104 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यात पुणे शहर पोलिस दलातील सहा पोलिस उपायुक्तांचा समावेश आहे.

• शहरात बदलून आलेले पोलिस अधिकारी, थेट कुठल्याही विभागात बदलीचे आदेश नाही

• पुणे शहरात राज्याच्या विविध भागातून 16 पोलिस अधिकारी बदलून आले आहेत. त्यामध्ये सात पोलिस उपायुक्तांची नव्याने शहर पोलिस दलात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल, स्मार्तना एस पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, अमोल झेंडे, विजय मगर या अधिकार्‍यांचा समावेश आहे. यापुर्वी बदल्या झालेल्या पोलिस आयुक्तांच्या आदेशात थेट एखाद्या विभागाचा उल्लेख असे. यावेळी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची थेट परिमंडळ किंवा एखाद्या विभागात नियुक्ती न करता या सर्व अधिकार्‍यांच्या बदली आदेशात "पोलिस उपायुक्त पुणे शहर" असाच उल्लेख करण्यात आला आहे.

• पोलिस उपायुक्तांच्या विविध ठिकाणी बदल्या, तर महिला पोलिस उपायुक्त 'एसआरपीएफ"मध्ये परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची नागपूर येथील राज्य राखीव पोलिस दलात (एसआरपीएफ) तर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची चंद्रपूर "एसआरपीएफ" व परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांची हिंगोली "एसआरपीएफ" येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांची मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त सागर पाटील यांची अमरावती शहरात पोलिस उपायुक्त म्हणून तर पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांची पिंपरी-चिंचवड येथे पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. तर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांची मुंबई येथील राज्य सुरक्षा महामंडळ येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

• लोहमार्ग, लाचलुचपत विभाग, पुणे ग्रामीण व गुन्हे अन्वेषण, राज्य राखीव पोलिस दलातील अधिकाऱ्यांची हि बदली, नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांची बिनतारी संदेश विभागात, तर नाशिक येथील पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक पदी, पुणे लोहमार्ग अधिक्षक पदी राजलक्ष्मी शिवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबरोबरच प्रवीण पाटील, दीपक देवराज यांची पुणे येथील राज्य राखीव पोलीस दल, यांची आनंद भोईटे यांची पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे लोहमार्गचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांची मुंबई येथील राज्य गुप्तवार्ता येथे तर गुन्हे अन्वेषण विभागतील संभाजी कदम यांची अमरावती येथे पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com