औंध - ‘केंद्र आणि राज्य सरकारने महापालिकेला निधी देण्यात कोणतीही कसर सोडली नाही, पण येथील जबाबदारी ज्यांच्यावर होती, ते लोक मात्र कमी पडले. आता पुण्याचा कारभारी बदलण्याची वेळ आली आहे. मला महापालिकेची सत्ता द्या, शहराचा कायापालट करून दाखवतो. बदल घडवला नाही तर अजित पवार नाव सांगणार नाही,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.