

पुणे - अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर कृती विभागाने हडपसर परिसरात धाड टाकून मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या तृतीयपंथीयासह तिघांना अटक केली आहे. या कारवाईत चार४ लाख ३१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अमली पदार्थ विक्रीच्या साखळीतील आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.