निवडणूक आयुक्त बैठक

निवडणूक आयुक्त बैठक
Published on

विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम पारदर्शकपणे पूर्ण करा : शीतल उगले

सातारा, ता. १० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारून निर्गमित करण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया कालबद्ध व पारदर्शकपणे पूर्ण करावी, अशी सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली-उगेल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर २०२६ ) संदर्भात विभागीय आयुक्त श्रीमती तेली-उगले यांच्या अध्यखतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी विठ्ठल इमनामदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
व्हीआयपी'' मतदारांची यादी विधानसभा मतदारसंघनिहाय एकत्र तयार ठेवावी, अशा सूचना करून श्रीमती तेली-उगले म्हणाल्या, ‘‘प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींच्या अर्जांसाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्यांच्या निर्गतीचा आराखडा सादर करण्यात यावा. सर्व अर्ज ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार आदेशाद्वारे निकाली काढून त्याचे इतिवृत्त तयार करावे. दावे आणि हरकतींचे अर्ज हे थेट मतदारांकडूनच प्राप्त होतील याची विशेष दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा प्रतिनिधीकडून गठ्ठा स्वरूपात अर्ज स्वीकारू नयेत.’’
ज्या मतदारांच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत किंवा मॅपिंग झालेले नाही आणि नोटीस देऊनही ते सुनावणीस उपस्थित राहिलेले नाहीत, त्यांना प्रक्रियेनुसार दुसरी नोटीस बजावून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. कागदपत्रांची छाननी व सुनावणीची प्रक्रिया शक्यतो मतदान केंद्रांच्या ठिकाणीच आयोजित करावी, जेणेकरून मतदारांना दूर जावे लागणार नाही, तसेच तरुणांच्या मतदार नोंदणीवर भर देताना १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावे नोंदवण्यासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजित करावीत.
या बैठकीनंतर विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पुनरीक्षण कामाची सविस्तर माहिती राजकीय पक्षांना देण्यात आली.

..................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com