Maharashtra Transport Strike : ई-चलनाच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक लुटीविरोधात आणि अन्यायकारक दंडाविरोधात राज्यातील वाहतूकदार संघटनांनी २ जुलैपासून बेमुदत बंदची घोषणा केली आहे.
पुणे : राज्यातील सर्व माल व प्रवासी वाहन चालकांची ई-चलनाच्या नावाखाली आर्थिक लूट होत आहे. याबाबत राज्य सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने राज्यातील सर्व वाहतूकदार संघटनांनी दोन जुलैपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.