लवळे परिसर जैववैविध्याचा खजिना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

पुणे : माळरान अन्‌ काहीसा पठराचा भाग असणाऱ्या लवळे परिसरात राखाडी धनेश, मोर, गव्हाणी घुबड, शृंगी घुबड, शिक्रा असे दहा-बारा नव्हे, तर तब्बल 120 पक्षी आढळून आले. तसेच, भेकर, मुंगूस व तरस असे जवळपास पंधराहून अधिक सस्तन प्राणी आणि फुलपाखरांच्या तीसहून अधिक प्रजातीच्या जैवविविधतेचा समृद्ध वारसा या भागात आढळून आला आहे. 

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या लवळे येथील जवळपास 350 एकर परिसरातील निसर्गसंपदेचा खजिना "फौना ऑफ सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी' या पुस्तकाद्वारे उलगडला आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे महासंचालक आणि विशेष सचिव सिद्धांत दास यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. प्रकाश राव, शिल्पा आवटे आणि डॉ. गुरुदास नूलकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. परिसरात सोळा सरपटणारे प्राणीदेखील आढळून आले आहेत. 

हवामानातील बदलामुळे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या शतकात पृथ्वीचे तापमान तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढण्याचा धोका आहे. कार्बनचे उत्सर्जन कमी करणे हा त्यावरील उपाय आहे. त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन करण्याची आवश्‍यकता आहे. 
- सिद्धांत दास, महासंचालक आणि विशेष सचिव, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग 

विद्यापीठाच्या परिसरात आढळणाऱ्या जैववैविध्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती व्हावी, हा या पुस्तकामागील उद्देश आहे. एप्रिल 2016 ते जुलै 2017मध्ये या परिसरात हे निरीक्षण केले. त्यातून हे जैववैविध्याचा खजिना उलगडला आहे. 
- शिल्पा आवटे, वन्यजीव अभ्यासक आणि लेखिका 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treasures of Biodiversity in lavale