Pune Revenue : दस्तनोंदणीत राज्यात पुणेकर भारी ; नऊ हजार कोटी रुपयांनी भरली राज्य सरकारची तिजोरी

दस्तनोंदणीच्या माध्यमातून राज्याच्या महसुलात सर्वाधिक भर टाकण्याचा मान पुणे शहराला मिळाला आहे. पुणे शहरातून मार्च अखेर (२०२३-२४) सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षीपेक्षा वीस हजारांहून अधिक दस्तांची नोंदणी झाली आहे.
Pune Revenue
Pune Revenuesakal

पुणे : दस्तनोंदणीच्या माध्यमातून राज्याच्या महसुलात सर्वाधिक भर टाकण्याचा मान पुणे शहराला मिळाला आहे. पुणे शहरातून मार्च अखेर (२०२३-२४) सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षीपेक्षा वीस हजारांहून अधिक दस्तांची नोंदणी झाली आहे. यावरून पुणे शहराची वाढ गतीने होत असल्याचे समोर आले आहे.

या वर्षी पुणे शहराच्या नोंदणी विभागाच्या नावावर अनेक विक्रम नोंदविले गेले आहेत. राज्यभरात दर दिवशी होणाऱ्या दस्तनोंदणीतून सुमारे १६० कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. परंतु पुणे शहरात शनिवारी (३० मार्च) एकाच दिवशी १४३ कोटी रुपयांचा महसूल दस्तनोंदणीतून मिळाला आहे. या आर्थिक वर्षात पुणे शहरातून ८ हजार ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात नऊ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे गतवर्षी पेक्षा या वर्षी (२०२३-२४) एकट्या पुणे शहरातून सुमारे ८७२ कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले आहे. रेडीरेकनरमधील दरात कोणतीही वाढ झाली नसताना हे उत्पन्न मिळाले आहे.

या वर्षात ३१ मार्चअखेर सुमारे २ लाख ८८ हजार ७८४ दस्तांची नोंदणी झाली असून, त्यातून सुमारे ९ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यात अभय योजनेतून ३५ कोटी रुपये, तर मागील वसुलीतून ६५ कोटी रुपये असे सुमारे शंभर कोटी रुपये मिळाले आहेत. उर्वरित सर्व रक्कम ही दस्तनोंदणीतून मिळाली आहे.

Pune Revenue
Pune Accident : मुलीच्या लग्नाच्याच दिवशी वधूपित्यावर काळाचा घाला

पुणे शहरात २१, तर पिंपरी-चिंचवड शहरात सहा अशी मिळून एकूण २७ दस्तनोंदणी कार्यालये आहेत. यापैकी आज एकाच दिवसात सर्वाधिक महसूल हा हवेली २५ (दापोडी) कार्यालयातून मिळाला. ७३ दस्तांच्या माध्यमातून सुमारे २ कोटी ७९ लाख रुपयांचा महसूल मिळाला, तर हवेली २० (आंबेगाव-दत्तनगर) येथील कार्यालयात दिवसभरात ५० दस्तनोंदणीतून २ कोटी ७८ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. आज दिवसभरात पुणे शहरात सुमारे ६७६ दस्त नोंदणीतून २३ कोटी ७८ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. यावरून पुणे शहरातील बांधकाम क्षेत्रात तेजीचे वातावरण असल्याचे दिसून आले आहे.

नोंदणी महानिरीक्षकांच्या मार्गदर्शन आणि सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्गाने केलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. बांधकाम क्षेत्र आणि नागरिकांनी केलेले सहकार्यामुळे पुणे शहरातून ३१ मार्चअखेर सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे..

- संतोष हिंगाणे, सहजिल्हा निबंधक, पुणे

पुणे शहर दस्तनोंदणीतून मिळालेला महसूल

वर्ष महसूल (कोटींमध्ये)

२०१६-१७ २ हजार ९५९

२०१७-१८ ३ हजार ८२३

२०१८-१९ ४ हजार ४४६

२०१९-२० ४ हजार ९३८

२०२०-२१ ४ हजार ११३

२०२१-२२ ६ हजार ८३६

२०२२-२३ ८ हजार १२६

२०२३-२ ९ हजार कोटी (सुमारे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com