
पुणे : रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने मूलभूत जीवित रक्षण करणारे उपचार द्यावेत. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास आवश्यकतेनुसार न्यायवैद्यक प्रक्रिया पूर्ण करून नातेवाइकांना मृतदेह सुपूर्त करावा. देयक (बिल) भरले नाही म्हणून मृतदेह कोणत्याही परिस्थितीत रोखून धरू नये, अशा स्पष्ट सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना देत त्यांचे कान टोचले आहेत.