असे होतात...  कोरोनाग्रस्तांवर उपचार 

असे होतात...  कोरोनाग्रस्तांवर उपचार 

पुणे - "कोविड-19'वर सध्यातरी कोणतेही औषध उपलब्ध नाही. असे असताना डॉक्‍टर कोरोनाग्रस्तांवर उपचार कसे करतात याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. कोरोनाबाधितांवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या आधारे भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि आरोग्य मंत्रालयाने उपचाराची पद्धत निश्‍चित केली आहे. 

श्‍वसनाशी निगडित आजाराला कारणीभूत कोरोना विषाणूने वैश्‍विक साथीचे स्वरुप 2002 आणि 2003 मध्येही धारण केले होते. त्याचेच सुधारित प्रारूप असलेला आजचा कोरोना विषाणू म्हणजेच "सिव्हिअर ऍक्‍युट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस -2' (सार्स कोविड-2) हा "कोविड-19' या संसर्गजन्य रोगास कारणीभूत ठरला आहे. आधीच्या म्हणजेच "सार्स कोविड' विषाणूच्या उपचारपद्धतीच्या आधारे सध्याची उपचारपद्धत विकसित करण्यात आली आहे. औषधाचा शोध न लागल्यामूळे यावरील अधिक प्रभावी उपचारपद्धतीसाठी अद्याप संशोधन सुरू आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संसर्गामुळे नक्की काय होते? 
"कोविड-19'ला कारणीभूत "सार्स कोविड-2' हा विषाणू प्रामुख्याने संसर्गग्रस्त व्यक्तीच्या श्‍वसनमार्गाच्या खालच्या भागात आढळतो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन रुग्णाला प्रामुख्याने फुफ्फुसाशी निगडित न्यूमोनियासारखा आजार होतो. रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असल्यास परिपूर्ण उपचार न मिळाल्यास तो दगावतो. 

"कोविड-19'ची लक्षणे 
1) सामान्य लक्षणे - श्‍वसनमार्गाच्या वरच्या भागात प्रथमतः विषाणू प्रवेश करतो. यामुळे ताप, खोकला, घसा दुखणे, शिंका येणे, डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात. 

2) सौम्य न्यूमोनिया - लहान मुलांना श्‍वसनासंबंधी त्रास उद्भवतो. 

3) गंभीर न्यूमोनिया - प्रौढ व्यक्ती - ताप किंवा श्‍वसनमार्गात संसर्ग, सामान्य वातावरणात श्‍वास घेणे शक्‍य होत नाही. 
लहान मुले - छाती भरून येणे, श्‍वास घेण्यास जास्त त्रास होणे. 

4) ऍक्‍यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम ः दोन्ही फुफ्फुसे निकामी होतात. 

उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना ः 
आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चार टप्प्यातील उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना निश्‍चित करण्यात आल्या आहेत. 

1) संशयित रुग्ण आढळल्यास ः संशयिताला विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. शस्त्रक्रियेच्या वेळी वापरण्यात येणारा तीन पडद्यांचा मास्क देण्यात येतो. परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाते. बाधित रुग्णाच्या श्‍वसननलिकेतील द्रव पदार्थाच्या माध्यमातून संसर्ग होतो. त्यामुळे इतरांना या द्रव पदार्थांच्या थेंबांतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी. रोगाची कारणमीमांसा होईपर्यंत सर्व खबरदारीचे उपाययोजनांचा अवलंब करावा. रुग्णाच्या हालचाली नियंत्रित कराव्यात. 

2) बाधित रुग्ण आढळल्यास ः आरोग्य कर्मचाऱ्यांनी "पीपीई' किटचा वापर करणे, एन-95 मास्क वापरणे, उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने परिसराचे निर्जंतुकीकरण करणे. 

3) सुरवातीचे उपचार ः 
- आवश्‍यकता असल्यास सप्लिमेंटल ऑक्‍सिजन थेरपी 
- उपलब्ध प्रतिजैविक औषधे (न्यूमोनियाची लक्षणांप्रमाणे) 
- रुग्णाच्या मायक्रोबायोलॉजिकल रिपोर्टप्रमाणे औषधांची मात्रा 
ृ- सातत्याने कोर्टिकोस्टेरॉईडचा वापर टाळावा 
- रुग्णाच्या बदलत्या लक्षणानुसार आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे उपचार 
- प्रतिकारशक्ती वाढविणारे औषधोपचार 
- "सिव्हिअर ऍक्‍युट रेस्पिरेटरी इलनेस'शी (सारी) निगडित मार्गदर्शक उपचारांचा वापर 

4) रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण घटणे आणि "एआरडीएस' 
- हायपोक्‍झॅमीक रेस्पिरेटरी फेल्युअर झाल्यावर ऑक्‍सिजन थेरपीचा वापर करावा 
- रिझर्व्हायर बॅग किंवा मास्कद्वारे ऑक्‍सिजन द्यावा (10-15 लिटर प्रतिमिनिट) 
- आवश्‍यकता भासल्यास मेकॅनिकल व्हेंटिलेशनचा वापर 
- परिस्थिती गंभीर झाल्यास लाइफ सपोर्ट सिस्टिमचा वापर 

औषधोपचार 
आरोग्य मंत्रालयाच्या वतीने हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीन आणि ऍझीथ्रोमायसीन ही औषधे वापरण्याची सूचना देण्यात आली आहे. हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीन 400 मिलीग्रॅम दिवसातून दोनदा तर, ऍझीथ्रोमायसीन 500 मिलीग्रॅम पाच दिवसांसाठी रात्री झोपताना दिले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com