

ARM26B03483
शेवगाव : रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्ताने झाडांना राख्या बांधून ‘वृक्षाबंधन’ साजरे करताना विद्यार्थी व शिक्षकवृंद.
-----------
रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये वृक्षाबंधन
शेवगाव, ता. ३१ : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनोख्या ‘वृक्षाबंधन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्या शाळेच्या परिसरातील वृक्षांना बांधून वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संकल्प केला. रक्षाबंधनाच्या पारंपरिक सणाला पर्यावरण संवर्धनाची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे पालक व परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
अध्यक्षस्थानी प्राचार्य बालाजी गायकवाड होते. यावेळी विद्यार्थ्यांनी परस्परांना राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व परस्पर संरक्षणाची भावना व्यक्त केली. यानंतर ‘वृक्षाबंधन’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील विविध झाडांना राख्या बांधल्या. ‘झाडे ही आपली भावंडेच आहेत, त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे,’ असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. वृक्षतोड रोखणे, झाडांचे संगोपन करणे, अधिकाधिक वृक्षलागवड करणे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.
विद्यालयाचे हरित सेना प्रमुख सचिन दहिफळे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व व पर्यावरण संतुलनातील त्यांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. हा उपक्रम प्राचार्य बालाजी गायकवाड, उपमुख्याध्यापक अविनाश रामफळे व पर्यवेक्षक महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.