अमरापूर- वृक्षतोडीची माहिती देणाऱ्यास एक हजार रुपयांचे बक्षीस; वृक्षमित्र उमेश भालसिंग यांचा पुढाकार,बातमी,फोटो

अमरापूर- वृक्षतोडीची माहिती देणाऱ्यास एक हजार रुपयांचे बक्षीस; वृक्षमित्र उमेश भालसिंग यांचा पुढाकार,बातमी,फोटो
Published on: 

वृक्षतोड रोखण्यासाठी वृक्षमित्राचा पुढाकार
माहिती देणाऱ्यास एक हजारांचे बक्षीस; उमेश भालसिंग यांचा उपक्रम
अमरापूर, ता. २५ : दुष्काळी स्थिती, वाढते तापमान, बदलते हवामान आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेले हरित क्षेत्र यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धनाची गरज अधिक जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर वृक्षतोड रोखून निसर्गाचे रक्षण करण्यासाठी वाघोली (ता. शेवगाव) येथील ग्रामविकासाचे संकल्पक व वृक्षमित्र उमेश भालसिंग यांनी पुढाकार घेतला आहे. अवैध वृक्षतोडीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा उपक्रम जाहीर केला आहे.
वृक्ष हे निसर्गाचे अनमोल धन असून मानवी जीवनासाठी ऑक्सिजन, सावली, शुद्ध हवा आणि पावसाचे संतुलन राखण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र, विकासाच्या नावाखाली किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक ठिकाणी वृक्षांची कत्तल केली जात असल्याने पर्यावरणासमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ,जमिनीची धूप, पर्जन्यमानातील अनियमितता आणि जैवविविधतेचे नुकसान यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वृक्षतोड रोखण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.
वृक्षसंवर्धनाचा संकल्प करून हिरवेगार भविष्य घडविण्यासाठी आपल्या परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्याची योग्य माहिती संबंधित यंत्रणेला किंवा भालसिंग यांना द्यावी,असे आवाहनही करण्यात आले आहे. या प्रोत्साहनाने पर्यावरण रक्षणाच्या कार्याला लोकसहभागाची जोड मिळणार आहे.
-----------
एक वृक्ष वाचविणे म्हणजे भविष्यातील अनेक जीवांचे रक्षण करणे'' ही भावना प्रत्येक नागरिकाने मनात रुजविण्याची गरज आहे. केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या झाडांचे संगोपन करणे आणि अस्तित्वातील वृक्षांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. निसर्गाचे रक्षण हीच खऱ्या अर्थाने भावी पिढ्यांना दिलेली अमूल्य भेट ठरेल.
--उमेश भालसिंग, वृक्षमित्र, वाघोली (ता. शेवगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com