

पुणे - शहरात मनमानी पद्धतीने पुणे महापालिका वृक्षतोड करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिक करत असून, यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल आहे. असे असताना दुसरीकडे महापालिकेने कोरेगाव पार्क येतील नॉर्थ मेन रोड हा रस्ता रुंद करण्यासाठी मध्यरात्री यंत्रणा कामाला लावून वृक्षतोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जागरूक महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
पुणे महापालिकेतर्फे कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली आहे. लेन क्रमांक सात ते कल्याणीनगर पूल या दरम्यानचा रस्ता सध्या १८ मीटर आहे, हा रस्ता २४ मीटर रुंद केला जाणार असून, दोन्ही बाजूने प्रत्येकी तीन मीटरचे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे ८० झाडे काढली जाणार आहेत.
गुरुवारी (ता. १४) मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास या रस्त्यावर वृक्षतोड सुरु असल्याने परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत होता. त्यामुळे काही नागरिकांनी तेथे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे जाऊन चौकशी केली. त्यांच्याकडे परवानग्या असल्या तरी रात्रीच्या वेळी झाड तोडण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार केली.
तक्रारदार विजया सुरतकर म्हणाल्या, ‘नॉर्थ मेन रोडच्या रुंदीकरणासाठी वृक्षतोड सुरु असताना तेथे महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. तसेच रात्रीच्या वेळी वृक्षतोड करण्यास बंदी असतानाही हे काम करण्यात आल्याने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नॉर्थ मेन रोड अर्धवटच रुंद केला जाणार आहे. झाडे तोडून हा रस्ता रुंद करण्याऐवजी महापालिकेने इतर उपाययोजना करणे आवश्यक होते.
पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘हा रस्ता सध्या १८ मीटर रुंद असून, तो २४ मीटर रुंद केला जाणार आहे. दिवसभर वाहतूक असल्याने वृक्षतोड करता येत नसल्याने हे काम रात्रीच्या वेळी करण्यात आले आहे. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात रामटेकडी येथील इंडस्ट्रिअल एरियामध्ये वृक्षारोपण केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.